अल्पवयीन मुलीचे पोलिसांसमोरून अपहरण 

पिंपरी – अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला औषधोपचारासाठी ससून रुग्णालयात आणले असताना तिला पुन्हा ससूनमधून फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी समोर आला आहे. ससून रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोरच हे अपहरण झाल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस आणि तरूणीच्या आईला गुंगारा देऊन तरूणीचे दुसऱ्यांदा अपहरण झाले आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 एप्रिल रोजी एका 16 वर्षीय मुलीचे एका तरुणाने अपहरण केले होते. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 7 एप्रिल रोजी आरोपीला ताब्यात घेतले होते आणि मुलीची सुटका केली होती. पोलिसांनी मुलीला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले. तिचा रक्तदाब कमी झाल्याने डॉक्‍टरांनी मुलीला काही दिवसांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. त्यानुसार मुलीला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. मुलगी आईसोबत रुग्णालयाबाहेर पडली. यावेळी पोलिसही सोबत होते. रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या औषधांच्या दुकानात मुलीची आई औषधे घेण्यासाठी गेली. त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्या मुलीचे पुन्हा अपहरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)