पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक

इस्लामाबाद: पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट अज्ञात हॅकर्सकडून हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही हॅकर्सने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट शनिवारी हॅक केली आहे. सध्या वेबसाईट सुरू असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हॅकर्सचा आम्ही शोध घेत असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर वेबसाईट हॅक झाल्यामुळे भारतीय हॅकर्सचे काम असल्याचे पाकिस्तानमध्ये बोलले जात आहे.

पाकिस्तानमधील स्थानिक वृर्तमानपत्र डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आला आहे. आयटी टीमने यावर नियंत्रण मिळवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईटवर सध्या पूर्ववत काम करत आहे. सध्या या सायबर हल्ल्यामागील सुत्रधाराचा शोध घेण्याचे काम आयटी टीम करत आहे.
या प्रकरणावर बोलताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल म्हणाले की, वेबसाईट हॅक झाल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. दुसऱ्या देशातून वेबसाईटावर नियंत्रण ठेवलं जात असल्याचे टेक्‍निकल टीमने सांगितले. सध्या वेबसाईट पूर्ववत काम करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानमधून वेबसाईट सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, ऑस्ट्रेलिया, सऊदी अरब, युके, नेदरलॅंड येथील वापरकर्त्यांनी वेबसाईट सुरळीत चालत नसल्याचा दावा केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईटवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे भारतीय हॅकर्सनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केल्याचा संशय पाकिस्तानातून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)