पत्नीवर गोळीबार करून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या

मुंबई – मंत्रालयातील सचिवाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून काल रात्री आपल्या पत्नीवर २ गोळ्या झाडल्या. व त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी होते. नुकतीच त्यांची बदली कौशल्य विकास विभागात झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)