#MeToo : मोदी सरकारमधील मंत्री ‘एम जे अकबर’ याच्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप

सुषमा स्वराज यांनी पत्रकारांशी याविषयी बोलणे टाळले

नवी दिल्ली – सोशल मीडियावर लैंगिक शोषणा विरूध्द सुरू करण्यात आलेले #MeTo हे अभियान चर्चेत आहे. बाॅलीवूडनंतर आता त्याची आग आता राजकारणातसुध्दा पोहचली आहे. कारण मोदी सरकारमधील मंत्री एम जे अकबर यांचे नाव याप्रकरणी समोर आले आहे. आता थेट केंद्र सरकारमधील परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर एका महिला पत्रकाराने #MeToo या माध्यमातून  लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

याबाबतीत महिला पत्रकार स्मिता शर्मा यांनी मंत्री सुषमा स्वराज यांना विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. पत्रकार स्मिता शर्मा यांनी विचारले की, ‘हा एक गंभीर आरोप आहे. तुम्ही सुध्दा एक महिला आहात, तुम्हा या आरोपांची चौकशी करणार का’? यावर सुषमा स्वराज या उत्तर न देताच पुढे निघून गेल्या. या विषयावर त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले. सध्या मंत्री एम.जे. अकबर हे नायझेरियात असल्याचे समजते आहे.

दरम्यान अकबर यांच्यावर आरोप  करताना महिला पत्रकाराने म्हटलं आहे की, ‘मुलाखतीच्या निमित्ताने हॉटेलच्या खोलीत बोलावून त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले’. या विरोधात त्यांनी ‘#MeToo ‘ च्या माध्यमातून आवाज उठविला आहे. दरम्यान, महिला पत्रकाराने केलेल्या आरोप अद्याप मंत्री अकबर यांनी उत्तर दिलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)