अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ भारत दौऱ्यावर येणार

भारताबरोबरचे संबंध अधिक बळकट करण्यावर भर देणार

वॉशिंग्टन- भारताबरोबरचे संबंध अधिक बळकट करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ य महिन्याच्या अखेरीस भरत दौऱ्यावर येणार आहेत. भारताला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संरक्षणात्मक धोरणामध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे. चीन आपले प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भारत-प्रशांत भागामध्ये मुक्‍त आणि खुल्या वातावरणातील संचार हे ट्रम्प यांचे उद्दिष्ट आहे, असे पॉम्पेओ यांनी म्हटले आहे. 24 जानेवारीला ते दिल्लीला रवाना होतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या मोर्गन ओर्तागस यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

भारतीय उपखंडातील प्रशांत भागामधील आठवड्याभराच्या दौऱ्यादरम्यान पॉम्पेओ सर्वप्रथम दिल्लीला थांबतील. त्यानंतर ते दक्षिण कोरियाला जाणार आहेत. या दौऱ्यात ते श्रीलंका आणि जपानलाही भेट देणार आहेत.

भारतभेटीपूर्वी ते उद्या (बुधवारी) अमेरिका-भारत व्यापारी परिषदेला संबोधित करणार आहेत. चीनकडून भारतीय प्रशांत भागामध्ये लष्करी प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रामध्येही चीनकडून दावा केला जात आहे.

या समुद्रावर व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांच्याकडूनही दावा केला जात आहे. या पार्श्‍वभुमीवर भारतीय प्रशांत भागात समृद्ध, सामर्थ्यशाली भारत उभा करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीतील निकालंमुळे मिळली आहे, असे प्रवक्‍त्या मोर्गन ओर्तागस यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)