कर्नाटकातील भाजपा नेते ‘जनार्दन रेड्डी’ यांना अटक

file photo

बंगळरू : पॉन्झी इन्वेस्टमेंट घोटाळ्याप्रकरणी खाण व्यवसायिक आणि माजी राज्यमंत्री जनार्दन रेड्डी यांना सेंट्रल क्राइम ब्रँचने अटक केली आहे.  रेड्डी यांच्यासोबतच त्यांचा सहकारी महफूझ अली खान यालासुध्दा अटक करण्यात आली आहे. जनार्दन रेड्डी यांच्यावर मनी लाँड्रिंग आणि पाॅन्झी इन्वेस्टमेंट घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीला अवैध पध्दतीने पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.

रेड्डी यांना सबळ पुराव्यांच्या आधारावर अट्टक करण्यात आली असून त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती क्राइम ब्रॅचचे सीपी आलोक कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच जप्त करण्यात आलेले पैसे गुंतवणुकदारांना दिले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, पॉन्झी स्कीमशी संबंधित असल्याचा आरोप असलेले खाण व्यवसायिक जनार्दन रेड्डी शनिवारी पोलिसांसमोर हजर झाले. आपल्यावरील सर्व आरोप हे राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. रेड्डी यांना फरार घोषित केल्यापासून गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता.

शनिवारी ते पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे त्यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे जाहीर केले होते. आपण फरार झालेलो नसून बेंगळूरु शहरामध्येच आहोत. आपल्याला पळून जायची काहीही आवश्‍यकता नाही. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. आपण काही चुकीचे केले असल्याचे दाखवणारे कोणतेही कागदपत्र पोलिसांकडे नाही.

कर्नाटकमधील पूर्वीच्या भाजप सरकारमध्ये रेड्डी मंत्री होते. आपले नाव कधीही “एफआयआर’मध्ये नोंदवले गेले नाही किंवा आपल्याविरोधात कोणतीही नोटीसही बजावण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी प्रथमच क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी नोटीस बजावली गेली आहे, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)