सत्तेत आल्यास किमान वेतन योजनेचे अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यावर

प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तराखंड: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज उत्तराखंड येथे आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी किमान वेतन योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला. ते म्हणाले, “जर 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली तर देशभरामध्ये किमान वेतन योजना लागू केली जाईल. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला फायदा होणार असून किमान वेतनापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना सरकारकडून अनुदान देण्यात येणार आहे. हे सरकारी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाईल.”

गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधील निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न चांगलाच लावून धरला होता. राहुल गांधींना शेतकरी कर्जमाफीच्या जोरावरच या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता असे मानण्यात येते. आता 2019 लोकसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी यांनी किमान वेतन योजनेचा मुद्दा लावून धरला असून आगामी निवडणुकांमध्ये देशातील जनता कॉंग्रेस अध्यक्षांच्या या राजकीय खेळीस कशाप्रकारे कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

-Ads-

तत्पूर्वी भाजपाकडून देखील प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट अनुदान जमा करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील किमान वेतन योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा होईल असे जाहीर केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)