नोटाबंदीचे नुकसान भरून काढण्यासाठी किमान उत्पन्न योजना- राहुल गांधी

नवी दिल्ली  -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे झालेले नुकसान कॉंग्रेसची न्याय (न्यूनतम आय योजना) योजना भरून काढणार असल्याचा दावा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेला चालना आणि 20 टक्के गरीब जनतेला अर्थसहाय्य असे दुहेरी लक्ष्य ही योजना साध्य करणार आहे. न्याय योजनेची घोषणा केल्यावर भाजप हादरली आहे. मोदी सरकारने 5 वर्षे निष्ठेने काम केले असते तर आतापर्यंत देशातील गरिबी संपुष्टात आली असती. आम्ही नोटाबंदी किंवा जीएसटीसारखा उतावीळपणा केलेला नाही. ही योजना तयार करताना तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आल्याचे राहुल यांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांनी शेतकरी, छोटे तसेच मध्यम व्यापारी, बेरोजगार युवकांकडून केवळ हिसकावून घेतले आहे. माता तसेच भगिनींची बचतही त्यांनी हिरावून घेतली. आम्ही देशाच्या वंचित वर्गाला मोदींनी हिसकावून घेतलेले परत करू इच्छित आहे. 22 टक्के जनता अद्याप दारिद्य्रात जगत असल्याचा दावा राहुल यांनी मुलाखतीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)