खाण व्यवसायिक जनार्दन रेड्डी पोलिसांसमोर हजर 

आपल्याविरोधात राजकीय कारस्थान रचले गेल्याचा आरोप 

बेंगळूरु – पॉन्झी स्कीमशी संबंधित असल्याचा आरोप असलेले खाण व्यवसायिक जनार्दन रेड्डी आज पोलिसांसमोर हजर झाले. आपल्यावरील सर्व आरोप हे राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. रेड्डी यांना फरार घोषित केल्यापासून गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता.

-Ads-

आज ते पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे त्यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे जाहीर केले होते. आपण फरार झालेलो नसून बेंगळूरु शहरामध्येच आहोत. आपल्याला पळून जायची काहीही आवश्‍यकता नाही. आपण काहीही चुकीचे केलेले नाही. आपण काही चुकीचे केले असल्याचे दाखवणारे कोणतेही कागदपत्र पोलिसांकडे नाही.

पोलिस प्रसार माध्यमांची दिशाभूल करत आहेत. आपण पोलिसांसमोर प्रत्यक्ष हजर होणार आहोत. त्यावेळी या सर्व गोष्टींचा खुलासा केला जाईल, असे रेड्डी यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटले होते. त्यानुसार सेंट्रल क्राईम ब्रांचच्या कार्यालयामध्ये ते आज सकाळी आपल्या वकिलासमवेत हजर झाले. आपल्याविरोधात राजकीय कारस्थान करण्यात आले आहे आणि आपल्याला पोलिसांवर पूर्ण विश्‍वास असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले.

कर्नाटकमधील पूर्वीच्या भाजप सरकारमध्ये रेड्डी मंत्री होते. आपले नाव कधीही “एफआयआर’मध्ये नोंदवले गेले नाही किंवा आपल्याविरोधात कोणतीही नोटीसही बजावण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी प्रथमच क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी नोटीस बजावली गेली आहे, असे ते म्हणाले. सेंट्रल क्राईम ब्रांचच्यावतीने रेड्डी यांचे निकटवर्तीय अली खान यांचाही शोध घेतला जात आहे. अली खान हे सय्यद अहमद फरीद या अन्य एकाबरोबर अम्बिदांत मार्केटिंग प्रा. लि. या मनी लॉण्डरिंगशी संबंधित कंपनीच्या 20 कोटी रुपयांच्या व्यवहारामध्ये सहभागी असल्याचा संशय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)