आमदार इम्तियाज जलिल यांनी मराठा आरक्षणाविरोधातील याचिका घेतली मागे

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज (सोमवार दि. 28 जानेवारी)सुनावणी झाली तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला आव्हान देणारी दाखल केलेली याचिका अखेर एमआयएम आमदारांनी मागे घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकार मराठा आरक्षण देऊन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलिल यांनी केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारने समाजाला दिलेलं सोळा टक्के आरक्षण रद्द करावं, त्याचबरोबर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल रद्द करावा अशी मागणी इम्तियाज जलील यांनी याचिकेव्दारे केली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी  मुस्लिमांचा विरोध नाही मात्र मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

दरम्यान आज मराठा आरक्षणसंबंधीचा राज्य मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. तसेच या अहवालातील काही संवेदनशील भाग वगळून तो जाहीर करण्याची राज्य सरकारची विनंतीही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मराठा आरक्षणसंबंधीचा मागासवर्गाचा अहवाल याचिकर्त्यांना द्या – उच्च न्यायालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)