दुग्धवर्धक पदार्थ (गॅलॅक्टोगॉग्ज) (भाग :२)

दुग्धवर्धक पदार्थ (गॅलॅक्टोगॉग्ज) (भाग १)

बाळाची वाढ आणि विकास यामध्ये स्तनपानाचा मोलाचा वाटा असतो. आई जरी बाळाच्या जन्मानंतर लगेच स्तनपान सुरू करत असली तरी त्यात तरबेज होण्यासाठी थोडा काळ जावा लागतो, थोडा धीर ठेवावा लागतो. यादरम्यान बाळाला दूध पुरतेय का? बाळ अजून भुकेलेच नाही ना? भुकेमुळे बाळ किरकिर करतंय का? बाळाला पुरेल इतकं दूध मला येतंय ना? इ. इ. अशी काळजी स्वाभाविक असते आणि पहिलटकरिणींमध्ये ती जास्त प्रमाणात दिसून येते. नवीन बाळ, नवीन आई म्हटलं की अनेक सल्लेदेखील मिळतात.  
अंगावरचे दूध वाढवायला मदत करतील 
असे काही अन्नपदार्थ आहेत का?
स्तनपानाचे महत्त्व जगाच्या कानाकोपऱ्यात माहित असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अनेकविध दुग्धजन्य पदार्थ वापरले जातात. अशा पदार्थांना गॅलॅक्‍टोगॉग्ज अथवा लॅक्‍टोजेनिक पदार्थ असेही म्हणतात. ओटमिल, बार्ली, आलं, लसूण, पालेभाज्या, यीस्ट, बदाम, बडीशेप, हातसडीचा तांदूळ हे असे काही पदार्थ. रोजच्या चौरस आहाराबरोबर हे पदार्थ घेतले तरच ते उपयुक्‍त ठरतात.
मेथी : अंगावरचे दूध वाढवण्यासाठी मेथी सर्वात उत्तम समजली जाते. दूध सुरू करण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी देखील मेथी वापरली जाते. अतिरिक्त प्रमाणात वापरल्यास मेथी रक्तातली साखर कमी करू शकते आणि पोट बिघडण्याची देखील शक्‍यता असते. यामुळे मेथीचा वापर संभाळून करायला हवा.
शेवगा : स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये शेवग्याची उपयुक्तता सर्वपरिचीत आहे. शेवग्याला तर जादुई झाड म्हणून संबोधिले जाते. पण गरोगर राहू इच्छिणाऱ्या महिलांनी याचा वापर करू नये कारण फलित बीजाचे गर्भाशयात रोपण होण्याच्या प्रक्रियेत यामुळे अडथळा येण्याची शक्‍यता असते.
शतावरी : शतावरीमध्ये आयुर्वेदीक गुणधर्म असून ती दूधाचे प्रमाण वाढविण्यास मदत करते.
फ्रेंच लिलिऍक : ही औषधी वनस्पती देखील दुग्धवर्धक आहे. स्तनांमधील दूध तयार करणाऱ्या ग्रंथींवर याचा परिणाम होऊन दूधाचे प्रमाण आणि प्रवाह सुधारण्यास मदत होते. ज्या मातांमध्ये सुरुवातीपासूनच दूधासंबंधी काही तक्रारी आहेत अथवा ज्यांच्या स्तनांची काही शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांमध्ये दूध तयार करणाऱ्या ग्रंथींची कमतरता आहे, अशांमध्ये ही वनस्पती प्रभावी ठरते. यामुळे जवळपास 50% नी दूधाचे प्रमाण वाढते व दूध तयार करणाऱ्या ग्रंथींचा विकास होतो असे दिसून आले आहे.
बडीशेप : दूधाचे प्रमाण वाढवण्याबरोबरच बडीशेप पोटाचे त्रास, वात दूर करते. स्तनपान करणाऱ्या मातांना बऱ्याचदा मेथीबरोबर बडीशेप दिली जाते.
लाल रास्पबेरीची पाने : यामुळे दूधाचे प्रमाण वाढण्याबरोबरच बाळाच्या जन्मानंतर गर्भाशयाचा आकार पूर्वपदास येण्यास मदत होते. या पानांमध्ये जीवनसत्वे (उदा. नायसिन – ब गटातील जीवनसत्व) व खनिजद्रव्यांचे प्रमाण लक्षणीय असते. .
निरगुडी : जरी यामुळे प्रोलॅक्‍टिनचे प्रमाण कमी होत असले तरी पूर्वापारपासून हा पाला दूधाचे प्रमाण वाढवण्यासाठी वापरला जातो. ज्या महिलांमध्ये संप्रेरकांचे असंतुलन आहे अशांसाठी हा पाला विशेष उपयुक्‍त ठरतो. पण या पाल्यामुळे स्तनपान करणाऱ्या मातांची पाळी सुरू होऊ शकते.
अल्फाल्फा : यातील जीवनसत्वे व खनिजद्रव्यांच्या मुबलक प्रमाणामुळे दुधाचे प्रमाण वाढायला मदत होते. यातील मकेफ जीवनसत्वामुळे रक्‍तस्त्राव थांबायलाही मदत होते. बऱ्याचदा प्रसूतिआधी 6 आठवडे रक्तस्त्राव टाळण्यासाठी आणि नंतर काही महिने दूध भरपूर येण्यासाठी ही वनस्पती दिली जाते. रक्त पातळ ठेवण्यासाठी जे औषधे घेतात त्यांनी ही वनस्पती घेऊ नये.
ब्लेस्ड थिसल/मिल्क थिसल : दूध वाढवण्याबरोबरच प्रसूतिनंतरचे नैराश्‍य कमी करण्यासही यामुळे मदत होते.
ओवा : दुधाचे प्रमाण सुधारते पण फार काळ घेत राहिल्याने याचा यकृतावर परिणाम होऊ शकतो. यासाठी स्तनपान करणाऱ्या माता व बालकांनी फार काळ याचे सेवन करू नये.
हॉप्स : काही विदेशी मद्यांमध्ये (जर्मन बिअर) याचा वापर केला जातो. भारतातील मद्यांमधे मात्र याचा वापर केला नसतो. पण दुग्धवर्धक म्हणून याचा वापर करताना काळजीपूर्वक करायला हवा. योग्य प्रकार आणि प्रमाण महत्वाचे. याचा वापर फारसा सुचवला जात नाही कारण यामुळे गुंगी येऊ शकते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)