पुलवामातील पेंगलीना येथे युवकाची गोळ्या घालून हत्या

नवी दिल्ली – पुलवामा जिल्ह्यातील पेंगलीना गावी एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी पेंगलीना गावातील नाईक मोहल्ल्यात राहत्या घरासमोरच बुरखाधारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका युवकाला गोळया घातल्या. शौकत अहमद नाईक (25) अशी त्याची ओळख पटली आहे. शौकतला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार शौकत अहमद नाईक हा लष्करात भरती झाला होता, मात्र प्रशिक्षण अपूर्ण सोडून त्याने लष्कर सोडले होते. 15 जानेवारी 2018 रोजी तो प्रादेशिक सेनेत प्रशिक्षणासाठी भरती झाला होता. 18 मार्च रोजी जेकेएलआय (जम्मू काश्‍मीर लाईट इन्फंट्री) रेजिमेंटल सेंटरमध्ये मध्ये त्याला पाठवण्यात आले होते.

-Ads-

14 सप्टेंबर 2018 रोजी तो तीन दिवसांची रजा घेऊन घरी गेला, तो पुन्हा लष्करात परत आला नाहीे. 17 सप्टेंबर रोजी त्याला फरारी सैनिक घोषित करण्यात आले होते. शौकत अहमद नाईक याने सैनिक म्हणून शपथ घेतली नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)