सैनिक पत्नीचे खुले पत्र

संग्रहित छायाचित्र

माझ्या मित्र यादीत जवळपास 300 पोलीस अधिकारी आहेत, तर 100 जवान आहेत. मी स्वतः देशासाठी प्राण अर्पण करायला कधीही तयार असलेल्या एका जवानाची पत्नी आहे. माझे सासरेसुद्धा सेवानिवृत्त जवान आहेत. देशसेवेसाठी अशाच प्रकारे कित्येक जवान, पोलीस कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाची बाजी लावत असतात. तर कित्येक रोजच शहीद होत असतात. अशा शहीदांचा सन्मान करणे हे या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

अशा परिस्थितीत भाजपाने भोपाळ मधून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलेल्या मालेगांव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी असलेल्या व सध्या जामिनावर बाहेर असलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर हिने स्टेटमेंट केले की, शहिद हेमंत करकरे यांना जेव्हा दहशतवाद्यांनी मारलं, तेव्हा माझं सूतक संपलं. या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर केला. ही बाई पुढे म्हणते “मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी तपास करताना, पोलिसांनी माझा छळ केला. तेव्हाच मी त्यांचा सर्वनाश होईल असा शाप दिला होता. मला सांगा जिच्यावर आतंकवादाचे आरोप आणि पुरावे आहेत तिला पोलिसांनी रबडी खायला द्यावी का? नाही ना… मग पोलिसांचे काय चुकले?

आणि हिच्या शापात इतकी ताकत आहे तर हिने कधी पाकिस्तानला शाप का दिला नाही. तिकडे तिचे आई-वडील राहतात का? त्यांचा कुटुंबाचा निर्वंश होईल असे वक्तव्य केलं गेलंय, हा भाजपाचा खरा चेहरा आहे. यावर भाजपा प्रवक्‍त्यांचे म्हणणे आहे की, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचा काहीही संबंध नाही. संबंध नाही?
मुश्रीफ सरांचे थकज घखङङएऊ घअठघअठए हे पुस्तक वाचा, तुमच्या डोक्‍यात प्रकाश पडेल या भाजपवाल्यांचे संबंध कुठे कुठे आहेत आणि हे स्वतःच्या राजकारणासाठी सैन्याचा, पोलिसांचा, विचारवंतांचा, जनतेचा कोणाचाही जीव घेवू शकतात, त्यांचे राजकारण करु शकतात.

आता तुम्हीच विचार करा आणि ठरवा, असल्या देश विघातक कृती करणाऱ्या विकृत लोकांचे समर्थन तुम्ही करणार का? निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. भारतीय सैन्याच्या हौतात्म्यावर मतांची भीक मागणाऱ्या आणि शहिदांचा अपमान करणाऱ्या लोकांना धडा शिकवलाच पाहिजे. कहर म्हणजे एका चॅनेलचा आज ट्विटर सर्व्हे आहे की, प्रज्ञा सिंग ने जे शहीद करकरे सरांबद्दल स्टेटमेंट केलं तो अपमान आहे का? त्या चॅनेलला माझा उलट प्रश्न आहे. करकरे सरांचा अपमान आहे की नाही असा हा प्रश्नच निर्माण कसा होतो?

अपमान नाही अशी तुम्हाला शंका येतेय का? शेण खाणे यालाच म्हणतात अगोदर भाजपच्या साध्वीने खाल्ले त्या पाठोपाठ एका वृत्तवाहिनीने आणि आता यांच्या पाठोपाठ अंधभक्त खायला लागलेत. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, सर्वांनी हेमंत करकरेंचा फोटो आपला डीपी म्हणून ठेवा. जेणेकरुन सोशल मीडियावरील दबाव गटामुळे शहीद करकरेंचा अपमान करणाऱ्या त्या बाईला या देशाची आणि शहिदांची माफी मागावी लागेल.

जय हिंद.
मेधा आगवेकर
लेखिका सैनिक पत्नी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)