“उरी’साठी विक्‍की कौशलने घेतले लष्करी प्रशिक्षण

बॉलीवूडमधील अभिनेता विक्‍की कौशल याने प्रत्येक चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्पावधितच चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा विक्‍की आगामी “उरी’ चित्रपटातून पुन्हा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित या चित्रपटात विक्‍की सैनिकाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी त्याने सहा महिने लष्करी प्रशिक्षणही घेतले.

चित्रपटासाठी घेतलेल्या ट्रेनिंगबाबत विक्‍की म्हणाला, एसएफ कमांडोची भूमिका साकारण्यासाठी मला ध्यान आणि दृढताची आवश्‍यकता होती. प्रत्येक दिवशी मला स्वतःला प्रेरित करावे लागत होते. ही भूमिका साकारण्यासाठी मला 15 किलो वजन वाढवायचे होते, जे मला सहज शक्‍य होत नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय विक्‍कीने काही काळ सैनिकांच्या कुटुंबियांसमवेतही घालविला. यामुळे त्याला सैनिकाची भूमिका आणखीन मदत झाली. या प्रशिक्षणदरम्यान बूट कॅम्पमध्येही सहभागी होत त्याने दिवसातील 6 तास बूट कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेतले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यात विक्‍की हा युद्धासाठी निवड झालेल्या टीमला मार्गदर्शन करताना दिसतो. पाक हल्ल्यानंतर भारतीय जवानांना प्रोत्साहन देताना तो म्हणतो, “भारतीय लष्कराने हे युद्ध सुरू केले नाही, पण ते आपणच संपविणार आहोत.’ या चित्रपटात विक्‍की कौशल, गौतम आणि परेश रावल मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)