कोल्हापूरात 6 डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्य भरती 

कोल्हापूर – कोल्हापूर येथे 6 ते 16 डिसेंबर दरम्यान 11 दिवसांच्या कालावधीत सैन्य भरती मेळावा होणार आहे. या भरती मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करुन हा भरती मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी याच कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, या भरतीमध्ये आतापर्यंत 38 हजार तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली असून नोंदणीची 20 नोव्हेंबर 2018 ही अंतिम तारीख आहे. आगामी काळातही हजारो तरुण सहभागी होतील, असा अंदाज आहे. सैन्य भरतीची प्रक्रीया सुरुळीत, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी, यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशी सूचना त्यांनी केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)