सर्जिकल स्ट्राईकवरून इतका हंगामा करणे अनुचीत : कारवाईत प्रत्यक्ष भाग घेतलेल्या लष्करी अधिकाऱ्याचे मत

नवी दिल्ली: पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक विषयी सुरूवातीच्या काळात करण्यात आलेला जल्लोष अगदी स्वाभाविक होता पण त्यानंतरही त्या घटनेवर इतका हंगामा माजवणे योग्य नव्हते असे मत या कारवाईत प्रत्यक्ष सहभागी झालेले निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की या विषयाचे किती राजकारण करायचे आणि त्याचे असे राजकारण करणे योग्य आहे की नाही यावर राजकारण्यांनीच भाष्य केलेले बरे. चंदीगड मध्ये लष्करी साहित्य विषयक एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. व्युहात्मकदृष्ट्या सर्जिकल स्ट्राईक शक्‍यतो गुप्त राखणेच उचित असते असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या कारवाईद्वारे शत्रुचे नितीधैर्य खच्ची करणे हे मुख्य उद्दीष्ठ असते असे ते म्हणाले. तथापी या स्ट्राईकचे इतके स्तोम माजवणे अनावश्‍यक होते असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केल आहे. भारतीय लष्कराने केलेली ही कारवाई गुप्त राखणे योग्य नाही असे नमूद करीत एनडीए सरकारमधील मंत्री व खुद्द पंतप्रधान मोदींनी या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय सभांमध्ये अनेक वेळा दाखला दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केलेल्या मताला महत्व दिले जात आहे.

लेफ्टनंट जनरल हुडा यांच्या विधानावर कोणतेही मतप्रदर्शन करण्यास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी नकार दिला. ते म्हणाले की व्यक्तीगत पातळीवर व्यक्त करण्यात आलेल्या मताविषयी मला काहीही बोलता येणार नाही पण हुडा यांनी स्वत: या सर्जिकल स्ट्राईक मध्ये भाग घेतला होता त्यामुळे त्यांनी व्यक्‍त केलेल्या भावना महत्वाच्याच आहेत.

दरम्यान ले. जन हुडा यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर संधान साधले आहे. हुडा यांनी सच्च्या सैनिकाप्रमाणे हे विधान केले आहे असे त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)