शेजारी राष्ट्रांकडून लष्करी आधुनिकता ही चिंतेची बाब 

संभाव्य धोक्‍यांचा मुकाबल्यास हवाई दल समर्थ- हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली – आपल्या शेजारी देशांच्या सुरक्षा दलात आधुनिकीकरणाचा वेग आणि नवीन साधनांचा समावेश ही आपल्यासाठी चिंतेची बाब असू शकते. भारतामध्ये अद्याप तोडगा न सापडलेले भौगोलिक वाद आणि बिगरराजकीय घटकांकडून केले जाणारे उपद्रव हे देखील एक आव्हान आहे. अशाही परिस्थितीमध्ये इंडो पॅसिफिक भूभागामधील संभाव्य धोक्‍यांचा सामना करण्यासाठी भारतीय हवाईदल पूर्णपणे सक्षम आहे, असे हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय हिताला बाधा आणू शकणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हवाईदल तत्पर आहे, असेही ते म्हणाले. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा विश्‍वास व्यक्‍त केला.

जम्मू काश्‍मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेपलिकडील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांना हवाई दलाकडून उद्‌ध्वस्त करण्याची शक्‍यता त्यांनी नाकारली नाही. चीन आणि पाकिस्तानचा उल्लेख न करता त्यांनी या देशांकडून असलेल्या संभाव्य धोक्‍यांचा उल्लेखही केला. शेजारी देशांकडून कोणत्याही धोक्‍याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दल 24 बाय 7 सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.

चीनकडून हवाई दलाचे वेगाने आधुनिकीकरण केले जात आहे. तसेच भारताच्या सीमेलगत तिबेट स्वायत्त भूभागामध्ये पायाभूत विकासाचे कामही वेगाने केले जात आहे, या अप्रत्यक्ष उल्लेखही हवाई दलप्रमुखांनी केला. इंडो पॅसिफिक भूभागात चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्यासाठी अमेरिकेकडून भारताला प्रोत्साहन दिले जात आहे. नोव्हेंबर महिन्यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानने बहुप्रतिक्षित “कॉड’ पॅसिफिक सागरीक्षेत्रातील जलमार्गासाठी सहकार्याची निश्‍चिती केली आहे, असेही हवाई दल प्रमुखांनी सांगितले.

भौगोलिक एकसंधता जतन करण्यालाच सुरक्षितता म्हटले जाऊ शकणार नाही. राष्ट्रीय सामर्थ्याचे सर्व घटक समाविष्ट केलेल्या एका सर्वंकश धोरणाला सुरक्षितता म्हणावे लागेल. हवाई दलामध्ये महत्वाकांक्षी आधुनिकता होत आहे. त्यामध्ये लढाऊ आणि थेट मारक क्षमता असलेल्या विमानांच्या समावेशाला सर्वाधिक प्राधान्य आहे. यासाठी मिग-29, जॅग्वार आणि मिराज-2000 या विमानांची टप्प्याटप्प्याने क्षमतावाढ केली जात आहे. हवाई दलाच्या ताफ्यामध्ये 83 तेजस आणि 36 राफेल विमानांच्या समावेशाचाही त्यांनी उल्लेख केला. संरक्षण साहित्याच्या खरेदीमध्ये 114 लढाऊ विमाने आणि अन्य पर्यायही लवकरच स्वीकारले जातील, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)