माईक पॉम्पेओ यांची इराकला गुपचूप भेट

बगदाद: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी बुधवारी गुपचूप इराकला भेट दिली आणि तेथील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला इराकमधील तळावर अमेरिकेच्या सैनिकांची भेट घेतली होती. तेंव्हापासून पॉम्पेओ यांनी दोन आठवड्यात इराकला दुसऱ्यांदा भेट दिली आहे.

सिरीयामधून अमेरिकेच्या सैन्याची माघार घेण्याची घोषणा ट्रम्प यांनी अचानक केली होती. त्यानंतर इराक आणि मध्यपूर्वेतील जिहादींचा सामना करण्यासाठी पॉम्पेओ हे मित्र देशांचे दौरे करायला लागले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पॉम्पेओ हे अम्मान येथून कैरो, मनामा, आबुधाबी, दोहा, रियाध, मस्कत, कुवेत येथे जाण्याची शक्‍यता आहे. परराष्ट्र मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून पॉम्पेओ यांचा हा सर्वाधिक मोठा दौरा असणार आहे.

ट्रम्प यांनी घाईघाईने केलेल्या इराक दौऱ्यादरम्यान अमेरिका हा जगाचा पोलिस होऊ शकत नाही, असे सूचक वक्‍तव्य केले होते. तसेच त्यांनी इराकमधील लष्करी अधिकारी आणि सैनिकांचीही भेट घेतली होती. सिरीयामधून जरी अमेरिकेने सैन्य माघारी बोलावण्याची घोषणा केली असली तरी इराकबाबत तशी घोषणा अद्याप ट्रम्प यांनी केलेली नाही.

इराकने डिसेंबर 2017 मध्येच इसिसविरोधातील युद्धात विजय मिळाल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर इसिसच्या काही छुप्या दलांनी इराकमधील काही शहरांवर पुन्हा ताबा मिळवला होता. इराकमधील डोंगरदऱ्यांमध्ये दडून बसलेल्या या जिहादींकडून अजूनही छुपे हल्ले केले जात असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)