किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षकपदी ‘माइक हेसन’

नवी दिल्ली – न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माइक हेसन यांची आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) टी20 लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकापदी नियुक्ती करण्यात आली आहे. माइक हेसन यांना पुढील दोन वर्षाकरिता प्रशिक्षकपदी करारबध्द करण्यात आले आहे. ब्रॅड हॉज यांच्याजागी माइक हेसन यांना प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, माइक हेसन यांनी जून मध्ये न्यूझीलंड संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ‘ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून काही काळासाठी ब्रेक घेऊ इच्छित आहेत’. पंजाब संघाचे सीईओ सतीश मेनन यांनी याबाबतची माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सतीश मेनन यांनी सांगितले की, ‘आम्ही अनेक प्रशिक्षकांच्या संपर्कात होतो, मात्र अखेर आम्ही माइक हेसन यांची नियुक्ती केली. आम्ही त्यांच्यासोबत दोन वर्षाचा करार केला आहे. माइक हेसन यांनाच अापल्या सहाय्यक स्टाफची निवड करायची आहे’. अशात ते वीरेंद्र सेहवाग याची निवड करणार की नाही ? हे पाहावे लागेल. ‘विरेंद्र सेहवाग’ हा मागील सत्रात संघाचा मेन्टर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)