उद्या दुपारी चक्रीवादळ गाजा तामिळनाडूत धडकणार-20 हजार कुटुंबांचे स्थलांतर 

नवी दिल्ली – चक्रीवादळ गाजा भीषण रूप धारण करत असून ते उद्या दुपारपर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येऊन धडकेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पामबान आणि कुड्डालोर भागांना वादळाचा तडाखा बसणार असून प्रशासनाने वादळाला सामोरे जाण्याची तयारी केलेली आहे.

राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्‍यक तेवढी शिबिरे उभारली असून सुमारे 20,000 कुटुंबांना हलवण्याची तयारी करण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या असून रामेश्‍वरम आणि कुड्डालकोर येथील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. चक्रीवादळ गाजा चेन्नईपासून 540 किमी अंतरावर असून पुढील 24 तासात तामिळनाडूत चक्रीवादळ पोहचू शकेल, पुढील तीन दिवस चक्रीवादळाचा धोका असेल असे सांगण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)