बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस मान्यता

मुंबई: बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना गृह विभागामार्फत जारी करण्यात आली आहे. बेस्ट वाहतूक संघटनांनी विविध मागण्यांसाठी 8 जानेवारीपासून संप पुकारला आहे.

या पार्श्वभूमावर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात आल्या असून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अधिसूचनेनुसार आता बेस्ट संप कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करता येणार आहे. संप ज्यावेळी मागे घेतला जाईल, त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)