राजस्थानमध्ये वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं, पायलट सुरक्षित

जोधपूर – राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारतीय वायू सेनेचं मिग 27 हे विमान कोसळलं आहे. नियमित मोहिमेदरम्यान जोधपूर येथील एअरबेसवरून विमानाने उड्डाण केलं होतं. या विमानातील पायलट सुरक्षित आहे. त्याने प्रसंगावधान राखत विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली.

मिळालेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान दुपारी 11.45 च्या सुमारास कोसळले. राजस्थानातील सिरोही जिल्ह्यातील सीवगंज जवळ ही घटना घडली. विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, विमान अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी कोर्ट आॅफ इन्क्वायरीचा आदेश देण्यात आलेला आहे, अशी माहिती भारतीय वायूसेनेकडूनं देण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1112301569893126144

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)