एमआयडीसी 68 हजार हेक्‍टर जमीन खरेदी करणार 

मुंबई – महाराष्ट्र सरकार अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कंपन्यांना जमीन लागणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ म्हणजे एमआयडीसी आणखी 68 हजार हेक्‍टर जमीन खरेदी करून औद्योगिक विकासासाठी विकसित करणार आहे. त्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 2 अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. देशात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीतील 30 टक्‍के गुंतवणूक महाराष्ट्रात येते. सध्या एमआयडीसीकडे 84 हजार हेक्‍टर जमीन आहे. त्याचबरोबर 288 औद्योगिक वसाहती आहेत. त्यातील काम चांगले चालले आहे. मात्र, आगामी काळाची गरज पाहता विस्तारीकरणाची गरज पडणार असल्याचे सांगण्यात आले. वाहन, संरक्षण, विमान वाहतूक, रसायन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची शक्‍यता आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)