स्वच्छ सर्वेक्षणमध्ये म्हसवड शहराचा डंका

देशात 98 वा क्रमांक तर पश्‍चिम विभागात 71 वा क्रमांक

म्हसवड – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुरु असलेल्या स्पर्धेत देशभरातील नगरपरिषदांनी सहभाग नोंदवून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेत म्हसवड नगरपरिषदेने संपूर्ण शहराची स्वच्छता करत देशात 98 वा तर पश्‍चिम विभागात 71वा क्रमांक मिळवला. निकाल जाहीर होताच पालिका कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला.

भारत सरकारच्या वतीने देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहर स्वच्छतेचा नारा देताना यामध्ये संपूर्ण देशातील नगरपरिषदा, नगरपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या या आवाहनाला देशातील सर्व नगरपरिषदांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने देशभरातील नगरपरिषदांनी स्पर्धेत सहभागी होत शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू केले.

त्यानुसार म्हसवड नगरपरिषदेनेही या स्पर्धेत सहभागी होत शहर स्वच्छतेसाठी थेट नागरिकांनाच आवाहन करुन सहभागी करुन घेतले. पालिकेचे कर्मचारीही पदाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर स्वच्छ करण्यासाठी करत होतेच. सर्वांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले व पालिकेने देशात 98वा क्रमांक मिळवला.

म्हसवडकरांच्या सहकार्यामुळेच शक्‍य : मुख्याधिकारी

ही स्पर्धा देशपातळीवरील असल्याने संपुर्ण देशातील नगरपरिषदा यात सहभागी होणार होत्या. त्यामुळे स्पर्धा निश्‍चितच होती. स्पर्धेत अव्वल येण्यासाठी कार्यालयीन तयारी सुरू होतीच. पण नागरिकांचा सहभाग महत्वाचा होता. त्यामुळे आम्ही या नागरीकांना यात सहभागी केले. त्यांनी याबाबत आम्हाला केलेले सहकार्य हे फार मोलाचे ठरले. त्यांच्यामुळेच आम्ही हे यश मिळवु शकलो.

यापुढे सर्वच क्षेत्रात पालिका अव्वल राहिल -स्नेहल सूर्यवंशी

आज म्हसवडकर नागरिकांच्या सहकार्याने आम्ही देशपातळीवरील स्पर्धेत आम्ही झेंडा रोवला असून यापुढेही जनतेच्या सहकार्याने विकासकामांचा झेंडा असाच फडकवणार आहोत. आमच्या प्रयत्नाला म्हसवडकर जनतेची साथ मिळत असल्याने याचा परिणाम आगामी काही दिवसांत दिसेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)