मुंबईतील बंद पडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार

मुंबई: मुंबईतील बंद पडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण करणार आहे. त्यासाठी म्हाडा अधिनियम 1976 मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

प्रभादेवी येथील हातिसकर वाडीच्या पुनर्विकासात विकासकाने रहिवाशांची केलेल्या फसवणूकीसंदर्भात विधानसभेचे सदस्य सदा सरवणकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ही माहिती दिली आहे. बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी शासन स्तरावर धोरण निश्‍चित करण्यासाठी म्हाडाकडून शासनास प्राप्त झालेला प्रस्ताव, तसेच शासनाने 29 ऑक्‍टोबर 2016च्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेल्या 8 विधिमंडळ सदस्यांच्या समितीच्या अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने बंद पडलेले प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन असल्याचे मेहता यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)