ब्राझिलसमोर मेक्‍सिकोचे आव्हान ; अखेरच्या गटसाखळी लढतीत सर्बियावर 2-0 ने मात

मॉस्को: अपेक्षेप्रमाणेच चमकदार कामगिरी करणाऱ्या ब्राझिलने सर्बियाचे आव्हान मोडून काढताना ई गटातील अग्रस्थानासह फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली. पॉलिन्हो आणि थियागो सिल्व्हा यांनी गोल करताना ब्राझिलला दिमाखात बाद फेरी गाठून दिली.

सुपरस्टार खेळाडू नेमार सांतोसला या सामन्यात गोल करता आला नसला, तरी त्याने थियागो सिल्व्हाला गोल करण्यासाठी दिलेला अचूक पास निर्णायक ठरला. तसेच पॉलिन्होनेही योग्य वेळी गोल करताना ब्राझिलच्या विजयासाठी पायाभरणी करून दिली. ई गटातील दुसऱ्या विजयामुळे ब्राझिलचे 7 गुण झाले असून पहिल्या क्रमांकाने बाद पेरी गाठण्याचा मान मिळविल्यामुळे त्यांच्यासमोर उपउपान्त्यपूर्व फेरीत मेक्‍सिकोचे आव्हान आहे. दरम्यान स्वित्झर्लंडने कोस्टा रिकाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवून 5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकाने बाद फेरीत धडक मारली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याआधी मॉस्कोतील स्पार्टाक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. संपूर्ण वातावरण पाठीराख्यांच्या जल्लोषाने भारलेले होते आणि दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात केल्यानंतर धसमुसळ्या खेळाचा पहिला बळी ठरला ब्राझिलचा डाव्या बगलेवरील बचावपटू मार्सेलो. दहाव्या मिनिटाला मार्सेलोने लंगडतच मैदान सोडले, तेव्हा ब्राझिलचे पाठीराखे अस्वस्थ झाले होते. परंतु ब्राझिलच्या खेळावर त्याचा परिणाम झाला नाही.

नेमारला 30व्या मिनिटाला गोल करण्याची नामी संधी मिलाली होती. मात्र सर्बियाचा गोलरक्षक व्लादिमीर स्टॉजकोव्हिचने हाताच्या तळव्याने चेंडू बाहेर फेकला. त्यानंतर तीनच मिनिटांनी सर्बियाचा मध्यरक्षक ऍडम जॅजिक याने थेट नेमारलाच धक्‍काबुक्‍की केल्यामुळे वातावरण पुन्हा तापले. परंतु पंचांनी जॅजिकला यलो कार्ड दाखवीत परिस्थिती संयमाने हाताळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)