मेक्‍सिकोच्या गव्हर्नरचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

प्रातिनिधिक छायाचित्र

पुएब्ला (मेक्‍सिको): मेक्‍सिको मधील पुएब्ला प्रांताच्या गव्हर्नर, त्यांचे पती आणि त्या प्रांताचे एक सिनेटर असे तीन जण सोमवारी झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले. मार्था एरिका ओलोंसो असे अपघातात मृत्युमुख पडलेल्या गव्हर्नरचे नाव आहे. त्यांनी गेल्या 14 डिसेंबर रोजीच गव्हर्नर पदाची शपथ घेतली होती. त्या या प्रांताच्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. त्यांचे पती सन 2011 ते 2017 या काळात या प्रांताचे गव्हर्नर होते.

या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलटही ठार झाले आहेत. सांता मारिया हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर दहा मिनीटातच ते कोसळले. अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप समजलेले नाही. गव्हर्नरच्या निधनामुळे आता त्या पदावर दुसऱ्या व्यक्तीची तात्पुरती नियुक्ती करून त्या प्रांतात पुढील तीन ते पाच महिन्यात निवडणूक घ्यावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)