नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत आज यलो लाईनची मेट्रो वाहतूक मेट्रोच्या तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. त्यामुळे या मार्गावरील मेट्रो स्थानकांवर हजारो प्रवासी खोळंबून राहिले. ही लाईन समयपुर बादली ते हुडा सेंटर गुडगाव या स्थानकांना जोडणारी आहे.
या मार्गावरील कुतुबमिनार स्टेशनवर खोळंबून राहिलेल्या प्रवाशांची संख्या मोठी होती. छत्रपुर स्थानकावर मेट्रोच्या एका गाडीत झालेल्या बिघाडामुळे ही लाईन विस्कळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी तज्ज्ञांचे एक पथक तिकडे बिघाड दुरूस्त करण्यासाठी पाठवले. तथापी त्याला वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यानंतर सुलतानपुर आणि कुतुबमिनार स्थानका दरम्यानची वाहतूक सोडून दोन्ही बाजुला उर्वरीत मार्गावर ही वाहतूक सुरू ठेऊन गर्दीचे नियमन करण्यात आले.