मेट्रो स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा

पुणे – पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने नुकताच भूजल अधिनियम जाहीर केला आहे. त्यानुसार निवासी, अनिवासी इमारतींवरील पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाणी पुनर्भरण करणे बंधनकारक केले आहे. पाणी पुनर्भरणासाठी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) शहरातील सर्व मेट्रो प्रकल्पांनी सहभाग दर्शविला आहे. शहरात होऊ घातलेल्या मेट्रो मार्गावरील सर्व स्टेशन्सवर आणि मेट्रो मार्गावरील दोन पिलरच्या मधल्या जागेत पाणी पुनर्भरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने नुकताच नवीन भूजल अधिनियम जाहीर केला असून त्यामध्ये भूजल पातळी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी पाणी पुनर्भरण सारखे उपाय राबविणे गरजेचे आहे. अधिनियमामध्ये राज्यातील प्रत्येक निवासी व अनिवासी इमारतींवर पाणी पुनर्भरण यंत्रणा उभारणे बंधणकारक केले आहे. भूजल पातळी वाढविण्यासाठी शहरातील मेट्रो प्रकल्पांनाही सहभाग दर्शविला असून शहरात होणाऱ्या मेट्रोचे सर्व स्थानक आणि दोन पिलरमधील जागेत पाणी पुनर्भरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. भूजल प्राधिकरणाचे अधिकारी तसेच मेट्रो प्रकल्पांचे अधिकारी यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे, असे भूजल प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)