…तर मेट्रोसाठी नियंत्रित भूसुरूंग स्फोट

संग्रहित छायाचित्र

पुणे – पुणे शहर हे दख्खन पठारावरील बेसॉल्ट खडकावर वसलेले आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोचे काम करताना आवश्‍यकतेनुसार नियंत्रित भूसुरूंग स्फोटांचा पर्यायही महामेट्रोकडून अवलंबिला जाऊ शकतो, असे मत पुणे मेट्रोच्या रेंजहिल्स ते स्वारगेट भुयारी मार्गाचे प्रकल्प प्रमुख प्रमोद अहुजा यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गातील रेंजहिल्स ते स्वारगेट हा सुमारे 6 किलोमीटरचा मार्ग पूर्णत: भुयारी असून तो जमिनीखाली काळ्या खडकात सुमारे 28 मीटर खोल असणार आहे. या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीन वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे हा खडक फोडताना काही समस्या येतील असे वाटत नाही. मात्र, या मार्गावर पाच स्थानके असून त्या स्थानकांसाठी खोदाई करूनच जमिनीखाली 28 मीटर जावे लागणार आहे. अशा वेळी खोदाई करताना कठीण खडक आल्यास त्याचा विचारा करावा लागेल, असे अहुजा म्हणाले. तसेच हे स्फोट करणे आवश्‍यक वाटले, तरी आधी सर्व प्रकारच्या मशीनचा उपयोग करून खोदाई केली जाईल आणि त्यानंतर शेवटचा पर्याय हा स्फोटांचा असेल, मात्र, त्याची गरज भासणार नसल्याचेही अहुजा यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्थानकांसाठी नोव्हेंबरपासून खोदाई?
मेट्रोसाठी भुयारी मार्गांच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. त्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उघडणार असून त्यानंतर पुढील दोन महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून या मार्गावरील स्थानकांच्या कामाची खोदाई सुरू करणे शक्‍य असल्याचे अहुजा म्हणाले. त्यातही दाट लोकवस्ती असलेल्या स्थानकांचे काम नंतर सुरू केले जाणार असून पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर आणि धान्य गोदाम येथील स्थानकांचे काम हाती घेण्यास प्राधान्य राहणार आहे. याशिवाय, या सर्व स्थानकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी, वीज, गॅस वाहिनी, ड्रेनेज तसेच मोबाइल सेवा वाहिन्यांचे जाळे असून ते तातडीने शिफ्ट करण्यासाठी संबंधित आराखडा तयार करण्यात आला असून तो संस्थांना पाठविण्यात आल्याचे अहूजा म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)