मुंबई – बॉलीवूडमध्ये सध्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे #MeToo प्रकरण खूप गाजत आहे. तनुश्री दत्ताने २००८ साली एका चित्रपटाच्या वेळी आयटम सॉंग शूट केले जात असताना नाना पाटेकर यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले असल्याचे आरोप केले आहेत. तसेच तनुश्री दत्ता हिने गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर महिला आयोगाने अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस बजावली होती.
दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी काळ सायंकाळच्या सुमारास राज्य महिला आयोगाच्या नोटीसला लेखी उत्तर दिले आहे. तीन पानांच्या या लेखी उत्तरात नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताने लावलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच या घटनेच्या तपास पोलीस करत असल्यामुळे या प्रकरणी मी यापेक्षा जास्त माहिती देऊ शकत नाही,” असे ही पाटेकर यांनी पत्रात लिहिले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा