मुंबई – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आता मीटूच्या जाळ्यात अडकला आहे. माजी मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री निहारिका सिंह हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.तसेच पत्रकार संध्या मेनन हिने ट्विटरवर एकापाठोपाठ एक असे ट्विट्स करत निहारिकाची करुण कथा जगासमोर मांडली आहे.
निहारिका आणि नवाज “मिस लवली’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. निहारिकाने म्हटले आहे की,नवाजुद्दीन मला बोलला होता की, माझे स्वप्न आहे की, परेश रावल आणि मनोज वाजपेयी यांच्याप्रमाणे माझी बायकोसुद्धा मिस इंडिया किंवा मोठी बॉलिवूड अभिनेत्री असावी. त्यानंतर मला एकापाठोपाठ एक अशी नवाजची वेगवेगळी रूपे समोर येऊ लागली. त्यानंतर मी नवाजसोबतचे माझे सर्व संबंध तोडून टाकले.
A relationship gone sour, isn’t #MeToo someone needs to recognise the toxic difference before we go picking sides.
I stand by #NawazuddinSiddiqui or #Nowaz as a man.— Kubbra Sait (@kubrasait) November 10, 2018
दरम्यान, सिद्दिकीला पाठींबा देत सेक्रेड गेम्समधील कुकू म्हणजेच कुब्रा सेट हिने नवाजला पाठिंबा देणारे ट्विट शेअर केले आहे. तसेच या ट्विट मध्ये नाते आणि मीटू या गोष्टींमधला फरक निहारिकाला समजायला सांगितला आहे. ”एक नाते तुटल्यानंतर दोघांमध्ये घडलेल्या घटना मीटू नाहीत. लोकांना मीटू आणि नातं या गोष्टींमधला फरक समजायला हवा, मी एक व्यक्ती म्हणून नवाजच्या सोबत आहे”.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा