#MeToo: ‘जर महिलांशी गैरवर्तन केले…’ : अजयने भरला दम

मुंबई – गेल्या काही दिवसात #MeToo मोहिमेद्वारे भारतासह जगभरात अनेक वरिष्ठ सिनेअभिनेत्यांवर आरोपांची मालिका सुरु असून अशा प्रकारचे आरोप लावणाऱ्या महिला कलाकारांना देखील संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधून चांगला पाठींबा  मिळत असल्याचे चित्र आहे. यातच बॉलीवुडमध्ये #MeeToo मोहीम फार पुढे गेले असून आमिर खान,अक्षय कुमार यांसारख्या सुप्रसिद्ध एक्टर्सने #MeeToo मोहीम संदर्भांतील आरोपी सोबत सिनेमा करण्यास नकार दिला आहे. या मोहिमेस सुप्रसिद्ध एक्टर्सच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जास्त प्रमाणात समर्थन मिळाले आहे.


बॉलीवूड सुप्रसिद्ध एक्टर्स आमिर खान,अक्षय कुमार प्रतिसादानंतर आता अजय देवगन ने सुद्धा ट्वीट शेअर करत या मोहिमेस समर्थन केले आहे. अजय देवगन आपल्या ट्वीट मध्ये म्हणतो कि, ”बॉलीवुड मध्ये जे काही होत आहे त्यामुळे  मी फार दुखी आहे. माझी कंपनी व मी महिलांना सर्वोच्च सन्मान देण्यामध्ये विश्वास ठेवतो, जर कुठल्याही महिलेच्या बाबतीत कोणीही गैरवर्तन करत असेल तर मी माझी कंपनी अशा व्यक्तीला पाठीशी घालणार नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)