#MeToo : न्यायालयाने विनता नंदा विरोधी मानहानीचा दावा करणारी मागणी फेटाळली

मुंबई – चित्रपट आणि टीव्ही शोसाठी कथा व सीन लेखनाचे काम करणाऱ्या प्रख्यात लेखिका विनीता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप काही दिवसा पूर्वी केला. एका फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी ही सारी कथा सविस्तरपणे लिहीली असून त्यात त्यांनी आलोकनाथ यांचे नाव थेट घेतलेले नाही पण एक संस्कारी अभिनेता म्हणून ज्या ज्येष्ठ अभिनेत्याला आज ओळखले जाते त्यानेच आपल्याला दारूत काही तरी मिसळून आपल्याला जवळपास बेशुद्ध केले व नंतर त्याने आपल्याला घरी सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार केला असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, अलोकनाथ यांच्या पत्नीने मानहानीचा दावा करण्याची मागणी आज दिंडोशी कोर्टाने फेटळली आहे. विनता नंदा  यांच्या आरोपानंतर सोनी राजदानसह इतरही काही अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तणुक केल्याचा आरोप केला होता. या प्रकारानंतर आलोकनाथच्या पत्नीने विनता नंदा विरोधात कोर्टात मानहानीचा दावा करण्याची मागणी केली होती. ही मागणी आज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)