MeToo चा प्रभाव, कैलाश खेरला इवेंटमधून दाखविला बाहेरच्या मार्ग

गेल्या काही दिवसापासून मी-टू’ च्या वादळाने देशात थैमान घातले आहे. सोशल मीडियामुळे या वादळाची तीव्रता घराघरात पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी बंगाली अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने तिच्यासंबंधी घडलेल्या एका गैरप्रकाराला वाचा फोडली आणि पाहता पाहता तिच्या या ‘ठिणगी’चे रूपांतर वणव्यात झाले. त्यानंतर अनेक क्षेत्रातील महिलांनी या संधीचे निमित्त साधून आपल्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या अन्यायाच्या तक्रारी जाहीरपणे मांडायला सुरुवात केली त्यामुळे हा वणवा आता भडकतच चालला आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका फोटो जर्नलिस्टने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पार्श्वगायिका सोना मोहापात्राने ही कैलास खेरवर आरोप केले होते. यामुळे कैलाश खेर यांना उदयपुर येथे 30 ऑक्टोबरला दिवाळी निमित्त संगीत संध्या सिंगर नाइट म्यूजिक इवेंट बोलवण्यात येणार होते. मात्र लैंगिक शोषणाचा आरोपमुळे आयोजकांनी त्यांचे नाव रद्द केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)