#MeToo: कोण आहे सपना भवनानी ?

मी टू मुळे अवघे बॉलीवूड हादरून गेले. रोज नवे-नवे आरोप होत आहेत. प्रथम अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर रोज एक नवीन प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे हे तेवढेच धक्कादायक देखील आहे. मी टू च्या वादळात मोठे मोठे सेलिब्रेटी अडकत असताना आता बॉलीवूड शेहनशाह बिग बी अमिताभच्या नावाची देखील चर्चा आहे. आतापर्यंत अमिताभ यांच्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत मात्र, त्यांच्यावर आरोप केला नसला तरी त्यांच्या अन्यायाचे पाढेही लवकरच वाचले जातील असं सूचक टि्वट अरस्टायलिस्ट सपना भवनानी हिने केले आहे.

अमिताभ बच्चन यांनी मी टू मोहिमेबद्दल आपली भूमिका मांडली होती. कोणत्याही महिलेशी अशा प्रकारचे वर्तन व्हायला नको, असे ते म्हणाले होते. यानंतर भवनानी हिने त्यांच्यावर हल्लाबोल केला. मी टू बाबत आपली भूमिका मांडणारी पोस्ट अमिताभ यांनी लिहिली होती. ती शेअर करत भवनानी हिने लिहिलं, ‘हे कदाचित जगातल सर्वात मोठं खोटं असेल. सर, पिंक सिनेमा प्रदर्शित होऊन गेलाय. तुमची कार्यकर्त्याची प्रतिमाही अशीच संपणार आहे. तुमचं सत्यही लवकरच बाहेल येईल.’ भवनानीच्या टि्वटनंतर सिनेवर्तुळात एकच खळबळ उडाली. तिने स्पष्ट केलं की ‘मला अमिताभ यांचा कोणताही वाईट अनुभव आलेला नाही. पण त्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक गोष्टी मी स्वत: ऐकल्या आहेत. या महिला पुढे येतील अशी मला आशा आहे.’

-Ads-

कोण आहे सपना भवनानी ?

सपना भावनी एक प्रसिद्ध हेयरस्टाइलिस्ट आहे. फॅशन, लेखन, फोटोग्राफी, मनोरंजन आणि रिअलटी शो क्षेत्रात तिच्या योगदानासाठी देखील ती ओळखली जाते. बिग बॉसच्या 6 हंगामात तिला सहभागामुळे ती चर्चेत आली होती. त्यानांतर तिने मुंबई मिररच्या वृत्तपत्रासाठी 3 वर्षे आणि नंतर मिड डे मध्ये स्तंभलेखन केले आहे. तसेच मनोरंजन, क्रीडा, राजकारण आणि व्यवसायासारख्या अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटी सोबत तिने काम केले आहे. प्रियंका चोप्रा, कॅटरीना कैफ, बिपाशा बसू, ऋतिक रोशन, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, जॉन अब्राहम, सिद्धार्थ माल्या, मंडी बेदी, दीनो मोरे आणि गौरी खान यांचा यामध्ये समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)