#MeToo: आलोकनाथ यांचा विनीता नंदावर मानहानीचा दावा

मुंबई- चित्रपट आणि टीव्ही शोसाठी कथा व सीन लेखनाचे काम करणाऱ्या प्रख्यात लेखिका विनीता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप काही दिवसा पूर्वी केला. एका फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी ही सारी कथा सविस्तरपणे लिहीली असून त्यात त्यांनी आलोकनाथ यांचे नाव थेट घेतलेले नाही पण एक संस्कारी अभिनेता म्हणून ज्या ज्येष्ठ अभिनेत्याला आज ओळखले जाते त्यानेच आपल्याला दारूत काही तरी मिसळून आपल्याला जवळपास बेशुद्ध केले व नंतर त्याने आपल्याला घरी सोडण्याच्या बहाण्याने बलात्कार केला असे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.


दरम्यान या प्रकरणी आलोकनाथ यांना नोटीस जारी केली जाईल आणि त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा आला नाही तर त्यांना सध्याच्या सर्व चित्रीकरणाच्या कामातून काढून टाकले जाईल असा इशारा सिने ऍन्ड टीव्ही आर्टिस्ट असोशिएशनने दिला होता. आलोकनाथ वर विनीता नंदा यांनबरोबरच अनेक महिलांनी गंभीर आरोप केला आहे. या घटनांवर आता आलोक नाथ यांनी प्रोड्यूसर विनता नंदा यांच्या विरोधात बदनामीच्या गुन्हा दाखल केला आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये #MeToo मोहिमेच्या अंतर्गत अनेक महिलांनी अनेक दिग्गज अभिनेतां बद्दल खुलासा केला आहे. नाना पाटेकर, साजिद खान, व‍िकास बहल, पीयूष मिश्रा, सुभाष घई अनेक दिग्गज लोकांची नावे पुढे आली आहे


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)