मेरटच्या आयकर आयुक्त काँग्रेसमध्ये

उत्तर प्रदेश : मेरट आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त प्रीता हरित यांनी आज आपल्या आयुक्त पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशसह देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु असून विविध राजकीय पक्षांमध्ये नवनवीन चेहऱ्यांचा प्रवेशाचे सत्र सुरु झाले आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेश  काँग्रेसमध्ये प्रीता हरित या उच्चशिक्षित चेहऱ्याचा समावेश झाल्याने काँग्रेसच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान प्रीता हरित यांनी आज उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी अद्याप उत्तर प्रदेश काँग्रेसतर्फे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये प्रीता हरित यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल याबाबत कोणतीही माहिती दिली नाहीये.

https://twitter.com/ANINewsUP/status/1108397095990497283

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)