दोन संस्थांच्या विलिनीकरणाला केंद्र सरकारची मान्यता 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने एनसीव्हीटी म्हणजेच नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग आणि नॅशनल स्कील डेव्हलपेंट एजन्सी या दोन संस्थांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य केला असून त्यातून नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग नावाची एक नवीन संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेचे नामकरण एनसीव्हीईटी असे असेल.
एनसीव्हीईटी ही नवी संस्था व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे नियंत्रण करील. यासाठी आवश्‍यक तो किमान दर्जा निश्‍चीत करण्याचे कामही ही संस्था करणार आहे. या संस्थेवर एक्‍झीक्‍युटीव्ह आणि नॉन एक्‍झीक्‍युटीव्ह या दोन्ही स्वरूपात सदस्य नेमले जाणार असून त्यांचे नियंत्रण स्वतंत्र अध्यक्षांकडे असेल. बाजारपेठेतील गरजेनुसार युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था कार्यरत राहील. कौशल्य विकास कार्यक्रमात खासगी संस्थांच्या गुंतवणुकीलाही यातून चालना दिली जाणार आहे. उद्योग संस्थांना कुशल कामगारांची चणचण भासू न देण्याची जबाबदारी ही नवीन संस्था पार पाडणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)