सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे- आदित्य ठाकरे

मुंबई:राज्यात परिपूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात येत आहे. ‘आयुष्यमान भारत’ अंतर्गत राज्यातील १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान, आदित्य ठाकरे बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे जीवनातील ताणतणाव वाढत चालला आहे. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावर योग्य निदान होणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रात मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी सारख्या आरोग्य सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा सामान्य माणसाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर मौखिक आरोग्य उत्तम असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मौखिक आरोग्याचा आपल्या आहार पद्धतींवर प्रभाव पडतो. आरोग्यवर्धिनी च्या माध्यमातून दंत व मुखरोग आरोग्य सेवा जनतेला मिळणार आहेत. सुदृढ युवा पिढी घडविण्यासाठी मानसिक व मौखिक आरोग्य उत्तम असणे महत्वाचे असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आजार होऊन नयेत म्हणून म्हणून शाळांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)