आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग स्पर्धा 2018 : भारतीय संघाने पटकावले कांस्यपदक

नवी दिल्ली – भारतीय अल्ट्रा रनिंग संघाने तैपेई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अल्ट्रा रनिंग 2018 स्पर्धेत सांघिक स्पर्धेत चांगली कामगिरी करताना यश मिळविले आहे. भारतीय अल्ट्रा रनिंगच्या संघाने स्पर्धेत तिसरे स्थान पटकावित कांस्यपदक मिळविले आहे.

भारतीय अल्ट्रा रनिंग पुरूष संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यादाच पदकाची कमाई केली आहे. तैपेई येथे झालेल्या  पुरूषांच्या स्पर्धेत उल्लास नारायण, सुनील शर्मा आणि एल एल मीना यांनी एकत्रितपणे 24 तासामध्ये 644 किलोमीटरचे अंतर पार करून तिसरे स्थान पटकावत भारताला पहिले कांस्यपदक मिळवून दिले. या सांघिक स्पर्धेत उल्लास नारायणने 250 आणि सुनिल शर्माने 202 किमी अंतर तर एलएल मीनाने 192 किमी अंतर असे एकत्रितपणे 644 अंतर पार करत कांस्यपदक भारताच्या नावे केले.

-Ads-

स्पर्धेत जापानच्या संघाने 756 किमी अंतर पार करत पहिले स्थान पटकावत सुवर्णपदक जिंकले तर आस्ट्रेलियाच्या संघाने 684 किमी अंतर पार करत रौप्यपदक पटकावले.

भारतीय महिलाच्या स्पर्धेत हेमलता सैनीने 172 किमी तर मीनल कोटकने 161 किमी अंंतर पार केले. अल्ट्रा रेस ही इतर रेसच्या तुलनेत फार लांब अंतराची असते. यामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ज्यामध्ये 50 किमी, 10 किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतर ठरवलेले असते. तर दुसरा प्रकार म्हणजे यामध्ये वेळ निश्चित केलेली असते. (उदा. 6 तास, 24 तास किंवा अनेक दिवस)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)