हॉकी विश्वचषक स्पर्धा : विश्वविजेत्यांनी केली विजयी सुरुवात

भुवनेश्वर  – येथे होत असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत ग्रुप बी मध्ये मागील दोनवेळा विजेते असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आयर्लंड संघाचा 2-1 असा पराभव करत यंदाच्या विश्वचषक अभियानाची सुरुवात विजयाने केली. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला 2-2 अश्‍या बरोबरीत राखण्यात चीन संघाला यश आले.

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यातील सामना संघर्षपूर्ण झाला. 11व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. त्यांच्यासाठी हा गोल ब्लैक गोवर्सने केला. परंतु, दोनच मिनिटांनी आयर्लंडच्या शेन ओ डोनोगहुएने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला.

-Ads-

टिमोथी ब्रैंड याने 33 व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला 2-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना चार डिसेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध होणार आहे तर त्याच दिवशी चीनसमोर आयर्लंडचे आव्हान असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)