कायद्यापुढे स्त्री-पुरुष समान (भाग-१)

व्यभिचाराच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेदभाव कायद्याने होता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अविवाहित पुरुषाने विवाहित स्त्रीबरोबर संबंध ठेवल्यास तो व्यभिचार ठरत नाही. मात्र, हीच गोष्ट विवाहित पुरुषाने केल्यास भारतीय दंडविधानाच्या कलम 497 अन्वये तो व्यभिचार ठरतो. खरे तर व्यभिचारात स्त्री ही पुरुषाइतकीच दोषी असूनसुद्धा तिला दोषी मानले जात नाही याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली होती. आता विवाहाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी पती आणि पत्नी दोघांची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून, एकट्या पुरुषालाच का दोष द्यायचा, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

व्यभिचाराला गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली असून, भारतीय दंडविधानाच्या कलम 497 अन्वये सध्या केवळ पुरुषालाच दोषी मानले जाते. स्त्रीसुद्धा तितकीच दोषी असूनही एकट्या पुरुषालाच शिक्षा का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आहे. खरे तर महिलाही या बाबतीत तितकीच दोषी असते; मात्र तिला जबाबदार मानले जात नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी पती आणि पत्नी दोघांची आहे. अशा वेळी एकट्या पुरुषालाच व्यभिचारासाठी कसे जबाबदार मानता येईल? न्यायालयाच्या मते, प्रथमदर्शनी व्यभिचार हे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन असून, त्यासाठी स्त्री-पुरुष दोघेही जबाबदार असतात. कलम 497 अन्वये प्रत्येक परिस्थितीत स्त्रीला पीडित मानले जाते, तर पुरुषाला फौजदारी खटल्याला सामोरे जावे लागते.

कायद्यापुढे स्त्री-पुरुष समान (भाग-२)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्याच्या काळात पुरुष असो वा महिला, प्रत्येकाला आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. गेल्या काही वर्षांत अशीही काही प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात स्त्रीच्या संमतीने संबंध प्रस्थापित झाले; मात्र नंतर संबंधित स्त्रीने पुरुषावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला. पीडितेबाबत दुःख व्यक्त करण्यात आले; मात्र नंतर तिचे आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले. सहमतीने प्रस्थापित झालेल्या संबंधांच्या बाबतीतसुद्धा एकट्या पुरुषालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाऊ लागले. एवढेच नव्हे तर विवाहबाह्य संबंधांचीही अनेक प्रकरणे समोर आली, ज्यात संबंध प्रस्थापित झाल्यानंतर पुढे ते आपल्या मनाप्रमाणे न राहिल्याने महिलांनी पुरुषांवर बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केले. सर्वांत दुर्दैवी बाब म्हणजे, खरोखर एखाद्या महिलेला फूस लावून गैरफायदा घेतला गेला असेल, तर अशा प्रकरणांकडेही या खोट्या प्रकरणांमुळे संशयाच्या नजरेतून पाहिले जाऊ लागले. अशी प्रकरणे मानवी दृष्टिकोनातून हाताळली जाणे आवश्यक असून, कोणत्याही एका पक्षाला दोषी मानणे अनुचित ठरते. अर्थातच, कोणताही दबाव किंवा भय नसेल आणि तरीही स्त्री अशा संबंधांमध्ये सहभागी होत असेल, तर ती सहमती मानली जाईल. वस्तुतः अशा प्रकारचे अनेक संबंध स्वतःच्या निवडीतून सुरू होतात; परंतु जेव्हा संबंधांमध्ये अडथळे येतात तेव्हा आरोप सुरू होतात.

– श्रीकांत देवळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)