लोकसभा अध्यक्षांची कठोर कारवाई, गुरूवारी आणखी 21 सदस्यांचे निलंबन

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरूवारी कठोर कारवाई केली. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय निर्माण केल्याप्रकरणी सुमित्रा महाजन यांनी तेलुगू देशम पार्टी (टीडीपी)चे 14 आणि अन्नाद्रमुक पक्षाच्या 7 सदस्यांना गुरूवारी चार दिवसासाटी निलंबित केलं आहे, त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.

श्रीमती महाजन यांनी टीडीपीचे 14 सदस्याविरूध्द गोंधळ केल्याप्रकरणी कारवाई केली. यामध्ये 12 सदस्याना भोजनवेळेआधी आणि 2 जणांना भोजनवेळेनंतर निलंबित केले. अन्नाद्रमुकच्या 7 सदस्यांना आजच निलंबित केलं गेले तर 25 सदस्यांचे बुधवारी निलंबन केलं गेलं होते. अशाप्रकारे दोन दिवसात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी एकूण 46 सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

लोकसभेमध्ये अन्नाद्रमुक आणि टीडीपीचे सदस्यांचा सकाळपासून गोंधळ चालू होता. गोंधळ करण्यासोबत हे सदस्य कागदाचे तुकडे अध्यक्षाच्या आसनाच्या आसपास फेकत होते. यावर अध्यक्षांनी सदस्यांना शांततेच आवाहन केलं तसेच कारवाईचा इशारा दिला मात्र तरीही गोंधळ सुरूच असल्याने संबंधित सदस्यांवर कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)