मेहुल चोक्‍सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला अटक 

ईडीची कोलकाता विमानतळावर कारवाई 

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी हे परदेशात फरार झाले आहेत. अशात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडीने) मेहुल चोक्‍सीचा सहकारी दीपक कुलकर्णी याला सोमवारी मध्यरात्री अटक केली आहे. हॉंगकॉंगहून कोलकाता विमानतळावर पोहचतान ईडीने कारवाई करत अटक केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपक कुलकर्णी याला Prevention of Money Laundering Act (PMLA) अटक करण्यात आली. दीपक कुलकर्णी याची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला मुंबईला आणण्यात येणार आहे. कारण यासंदर्भातली तक्रार मुंबईत दाखल करण्यात आली आहे. मेहुल चोक्‍सीच्या विविध व्यवसायांशी दीपक कुलकर्णी संबंधित आहे. तसेच कर्ज बुडवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी तो एक आहे, असेही ईडीने म्हटले आहे.

दीपक कुलकर्णी हॉंगकॉंगमध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्‍सीशी संबंधित असल्याचे समजते. त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंटही जारी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. आता त्याच्या चौकशीतून काय काय सत्य बाहेर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)