नगर: अखिल भारतीय माहेश्वरी महिला संघटनाच्या “समाधान एक पहल’ कार्यक्रमाअंतर्गत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भारतासह नेपाळमध्ये वितरण करण्यात आल्या. “आंतरराष्ट्रीय मासिक धर्म स्वछता व जागरूकता’ दिनी मशीन वेगवेगळ्या ठिकाणी बसवून एक विश्व रेकॉर्ड केले. सावेडी येथील रानाज वेलनेस सेंटर तर्फे मेहेर इंग्लिश स्कुलला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आली.
याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा, मेहेर इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष जगदीश झालानी, दादा चौधरी शाळेचे मुख्याध्यापक संजय मुदगल, रानाज वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ.शामा मंत्री, मेहेर इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी, सीमा दरेकर, स्वाती मुदगल, सोनाली शिंदे, भावना गायकवाड, मनीषा शिंदे, वैशाली देवतरसे, शकुंतला भंडारी, उषा भालेराव, भारती खांडेकर, आदींसह शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते. रानाज वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ.शामा मंत्री म्हणाल्या कि, हा उपक्रम नगर शहरात पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे.
सॅनिटरी नॅपकिन्स पॅड वेंडिंग मशीन द्वारे 5 रुपयात नॅपकिन्स उपलब्ध होणार आहे. या मशीन महिला व मुलींसाठी उपयुक्त ठरणार आहे. या सारखे अनेक उपक्रम संस्थेद्वारे चालवले जातात. मुलींच्या बौद्धिक विकास बरोबरच शारीरिक व मानसिक विकास होणे महत्वाचे आहे. यासाठी आरोग्य शिबिर, व्यक्तिमत्व शिबिर. योगा शिबिर. स्वसंरक्षण शिबिर घेण्यात येतात.