‘त्या’ व्हायरल व्हिडिओमधील भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाबद्दल मेहबूबा मुफ्ती म्हणतात…

भारतीय सैन्य दलांवरील हल्ल्याचा आज पाकिस्तानतर्फे करण्यात आलेला प्रयत्न चांगलाच फसला आहे. आज सकाळी भारतीय वायू सीमेमध्ये प्रवेश करत पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तत्पर असलेल्या भारतीय वायुदलातर्फे जम्मू येथील राजोरी भागामध्ये पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडून हा हल्ला अयशस्वी करण्यात आला. भारतीय सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पाडण्याच्या कारवाई दरम्यान भारताचे मिग २१ हे विमान बेपत्ता झाले असून या विमानाचा वैमानिक देखील बेपत्ता झाला आहे.

दरम्यान, पाकिस्तानतर्फे भारताचे बेपत्ता विमान व वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला असून सदर वैमानिकाचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी देखील हा व्हिडीओ ट्विट केला असून त्या लिहतात, “शांत आणि संयमपूर्ण. विंग कमांडर अभिनंदन यांच्या धैर्याला सलाम. अशावेळी स्वतःला सांभाळणे खूप शौर्याचे काम आहे. जे युद्धाची भाषा बोलत आहेत त्यांनी यातून धडा घ्यावा.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्विटर या सोशल माध्यमावर @atif नावाच्या खात्यावरून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये एका इसमास (दावा करण्यात येत आहे की हा व्यक्ती भारतीय वायुसेनेचा बेपत्ता वैमानिक आहे) कॅमेऱ्या समोर उभे करण्यात आले असून त्याला एक अज्ञात  व्यक्ती काही प्रश्न विचारताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये बेपत्ता भारतीय वैमानिक असल्याचा दावा करण्यात आलेली व्यक्ती आपले नाव अभिनंदन असून पाकिस्तानतर्फे आपणाला बंदी बनवल्यानंतर चांगली वागणूक देण्यात येत असल्याचे सांगताना दिसत आहे.

या व्हिडिओच्या सतत्येबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने या व्हिडिओच्या सतत्येबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.

https://twitter.com/MehboobaMufti/status/1100743877475139584

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)