मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनपटावर ‘वेबसेरीज’

प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलझार आणि रिलायन्स इंटरटेन्मेंटचे फँटम फिल्मस यांच्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘वेब-सिरीज’ची निर्मिती करण्यासाठीचा करार झाला आहे.
“राकेश मारिया यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यांचा यशस्वीपणे छडा लावला आहे. केवळ शहरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील गुन्हेगारीचे सूक्ष्म निरीक्षण मारिया यांनी केले असल्याने त्यांच्या नजरेतून गुन्हेगारी जगत कसे दिसते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल” असे वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलझार यांनी केले.
दरम्यान राकेश मारिया यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये १९९३चे मुंबई बॉंबस्फोट, २००३ मधील जव्हेरी बाजार व गेट वे ऑफ इंडिया दुहेरी बॉंबस्फोट, तसेच २६/११ हल्ल्यांमध्ये सापडलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याचा उलट तपास इत्यादी महत्वाच्या गुन्ह्यांचा शोध लावला आहे.
राकेश मारिया या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या चष्म्यातून गुन्हेगारी जगताचे चित्रण होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप तरी या वेब-सिरीजची प्रीमियरची तारीख घोषित करण्यात आली नाही.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)