#दखल: मेघालय युग आणि बोध (भाग ३)

श्रीनिवास औंधकर (खगोलशास्रज्ञ)  
सध्या सुरू असलेल्या 11700 वर्षांच्या युगाचा सर्वांत प्रारंभिक कालखंडाचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला असून, त्याला मेघालय युग असे नाव देण्यात आले आहे. हा कालखंड केवळ सोयीसाठी केलेला नसून, पृथ्वीवरील मोठ्या फेरबदलाचा साक्षीदार म्हणून हा कालखंड आपल्या इतिहासाला, संस्कृतीला, जीवनशैलीला कलाटणी देणारा ठरला आहे. अशा कालखंडाच्या प्रारंभाच्या खुणा भारतात सापडाव्यात आणि मेघालयाचे नाव या युगाला देण्यात यावे, हा भारताच्या दृष्टीने मोठाच गौरव आहे तसाच तो जबाबदारीचे भान देणाराही आहे.
याच प्रदीर्घ कालखंडात मानवाने एवढी प्रगती केली, की जगाच्या सीमा ओलांडून अंतरिक्षातही आपले स्थान निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. हाच कालखंड असा आहे, ज्यात पृथ्वीवर पुन्हा एकदा मोठी संकटे येऊ घातली आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वी अशीच गरम होत राहिली, तर इतिहासाचा आणखी एक टप्पा संपून नवा टप्पा सुरू होऊ शकतो, असे मानले जाते. म्हणजेच मेघालय युगाच्या प्रारंभापासूनचा विचार केला असता, पृथ्वीवरील धोक्‍यापासून धोक्‍यापर्यंतचा एक संपूर्ण कालखंड आपल्यापुढे उभा राहतो. तोच मेघालय कालखंड होय.
मेघालयातील जीवनशैली आजही निसर्गपूरक आहे. त्यामुळे पृथ्वीला नव्या धोक्‍यांपासून कसे वाचवायचे, याचे उत्तर आपण मेघालयाच्या याच जीवनशैलीत शोधायला हवे. मानवी संस्कृती प्रगत होत जाते आणि आपण आपल्या पावलांची चिन्हे काळाच्या शिलालेखावर कोरून पुढे जात असतो. हा केवळ एक वाक्‌प्रचार नसून, मोठे सत्य या वाक्‍याला जोडलेले आहे. आपल्या पावलांची चिन्हे खरोखर शिळेवरच कायमस्वरूपी राहू शकतात. या पदचिन्हांवरूनच आपल्याला हे वास्तव सापडले आहे की, आपण ज्या युगात राहतो आहोत, ते एखाद्या राजा-महाराजाने सत्ता हाती घेतल्याच्या क्षणापासून सुरू झालेले नव्हते, तर ते युग दोनशे वर्षांच्या प्रचंडजागतिक दुष्काळामुळे सुरू झाले होते.
मेघालयन युगामुळे मेघालयाचे नाव जगभरात गाजले आहे. ज्या गुहेत याचे पुरावे सापडले, ती समुद्रसपाटीपासून 1290 मीटर उंचीवर असून, मॉमलुह गुँफा असे तिचे नाव आहे. जगातील सर्वांत खोल आणि लांबलचक गुहांमध्ये या गुहेची गणती केली जाते. या गुहेच्या छतावरून ओघळत असलेल्या पाण्यातून जी खनिजे खाली सांडली, त्यातून नव्या खडकाचा जन्म झाला. या प्रक्रियेमुळेच कालविभाजन झाल्याचे मानले जाते. 4.6 अब्ज वर्षांचा पृथ्वीचा इतिहास शास्त्रज्ञ अनेक विभागांत विभागतात. कल्प, संवत, अवधि आणि युग अशी ही परिमाणे आहेत.
कालखंडाचा सर्वांत छोटा भाग आहे ईपॉक. सध्या सुरू असलेला ईपॉक हा होलोसीन ईपॉक आहे. हे ईपॉक पुन्हा तीन कालखंडांमध्ये विभागले जाते. अप्पर, लोअर आणि मिडल. यातील तिसऱ्या म्हणजे लोअर कालखंडाला मेघालय युग असे नाव दिले गेले आहे. हे केवळ सोयीसाठी केलेले कालखंड नसून, पृथ्वीवरील मोठ्या बदलांचे निदर्शक आहेत. होलोसीन ईपॉकचे वैशिष्ट्य असे की, या कालखंडात मानवाने जगातील अन्य जीवजंतूंवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले होते. त्यातही मेघालय युगाचे वैशिष्ट्य असे की, ते मानवी इतिहासातील मोठ्या उलथापालथीचे साक्षीदार बनले. सांस्कृतिक बदलाचे वाहक बनले. मानवी जीवनशैलीत मोठे फेरबदल याच कालखंडात झाले. या बदलाच्या खुणा मेघालयात आढळल्या, हा भारताचा गौरवच मानायला हवा.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)