मेघा धाडे ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर !

अभिनेत्री मेघा धाडेने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावल्यानंतर बिग बॉस हिंदीच्या बाराव्या पर्वात दमदार एन्ट्री घेतली. पण मेघा या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मधून आऊट झाली आहे. कोणाचेही एलिमिनेशन करणार नसल्याचे सांगत गेल्या आठवड्यात सलमान खानने स्पर्धकांना सुखद धक्का दिला होता. पण सलमानने यावेळी त्याहून मोठा धक्का दिला तो म्हणजे दुहेरी एलिमिनेशनचा. जसलीन मथरु आणि मेघा अशा दोघींना या आठवड्यात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून मेघाने 36 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. पण तिचे ग्रॅंड फिनालेला अवघे काही दिवस बाकी असतानाच एलिमिनेशन झाले. मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने यापूर्वी ‘बिग बॉस 12’मध्ये प्रवेश केला होता. पण तिला महिन्याभराच्या आतच घराबाहेर पडावे लागल्यानंतर मेघाला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली.

महाराष्ट्रात हिंदी बिग बॉसला विशेषत: मराठी प्रेक्षकांची म्हणावी तशी पसंती मिळाली नव्हती. शिवाय बिग बॉसची चर्चाही मराठी प्रेक्षकांमध्ये नव्हती. दुसरीकडे, मेघा मराठी बिग बॉसमुळे घराघरात पोहोचली होती. हिंदी बिग बॉसने मेघाला तिची लोकप्रियता एन्कॅश करण्यासाठी एन्ट्री दिल्याची चर्चा होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)